धर्म म्हणजे काय?

2

Written on 7:46 PM by केदार जोशी

धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का? धर्म वेगळा असतो का?
पाहिलंत किती प्रश्न पडले ते?


वेबस्टर नुसार धर्माची व्याखा अशी केली आहे. "a strong belief in a supernatural power or powers that control human destiny"


ही व्याख्या अयोग्य आहे असे मला वाटते। धर्म म्हणजे कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे व ती हे विश्व चालवते असे म्हणने व समजने मला स्वतःला अंधश्रध्दा वाटते. हा विचार मी आस्तिक असुनही करत आहे कारण एकदाका "तोच" हे सर्व चालवतो असे ठरविले की मग संपले. तिथे मग जगात घडनारी प्रत्येक गोष्ट त्यानेच घडविली व तेच बरोबर आहे असे समजने. मग ह्या व्याखेनुसार मुंबईत अशातच झालेला अतिरेकी प्रकार पण काही जण बरोबर ठरवतील कारण ती "त्याचीच" आज्ञा समजली जाईल.


हिंदु धर्मानुसार जर आपण व्याख्या करायला जाऊ तर एका वाक्यातली सोपी व्याख्या मी करेन.
"धर्म म्हणजे सत्याचे ज्ञान"
विश्व कोणी तरी चालवतो व आपल्या सर्वांच्या नाड्या त्या देवाच्या वा अज्ञात शक्तीच्या हातात आहेत असे आपण जेव्हां माणतो तेंव्हा आपण धर्माला अर्धवट समजुन घेतले आहे.
जेंव्हा आपल्या सर्व प्राथमिक गरजा भागल्या जातात तेंव्हा माणुस "स्वतः बद्दल विचार" करायला लागतो। जेंव्हा विचार धार्मीक दृष्ट्या होतो तेंव्हा तो अंतर्मुख व्ह्यायला लागतो. व प्रश्न पडायला लागतात. " मी कोण", " माझे नंतर काय होणार्","मॄत्यू आहे का"? वैगरे वैगरे. हे प्रश्न जेंव्हा पडतात तेंव्हा त्याचे उत्तर द्यायला "धर्म" कामी येतो.


कुठल्याही धर्माला निर्मान व्हायला दोन मुख्य बाबी लागतात।

१ त्या धर्माचे तत्वज्ञान

२. त्या धर्मांची दैनंदिनी म्हणजेच कर्मकांड
नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.
वेंदातानुसार धर्म म्हणजेच सत्य आणी धार्मिक म्हणजे त्या सत्याकडे जाणारा माणूस.
आपल्या स्वतः मधील काही गोष्टींना दुर करुन माणूस हा त्या सत्याकडे जाउ शकतो. त्या सत्याचे जेंव्हा ज्ञान होईल तेंव्हा तो ज्ञानी होइल.
देव तुम्हाला दिसला का? ह्या प्रश्नावर उत्तर देताना रामकृष्णांनी हो सांगीतले व पुढे विवेकानंदाना "आत्मसाक्षात्कार" घडवुन आणन्यास मदत केली. हा आत्मसाक्षात्काराकडे जाणारा मार्ग म्हणजेच हिंदु पध्दती नुसार धर्म. आणि म्हणूनच विवेकानंदानीं "सत्याची वा देवाकडे जाण्याची रेसीपी" लिहून नाही ठेवली कारण हा "आत्म" साक्षात्कार आहे जो फक्त अनुभुती घेउनच मिळू शकतो.
विवेकानंद एके ठिकानी म्हणतात, ""Religion is the manifestation of the divinity already within man।" And to the question of what form this manifestation of divinity takes, the answer was "in consciousness".


वेदांता नुसारा धर्म म्हणजे आपल्याच मध्ये असलेल्या शक्ती कडे जाण्याचा रस्ता.
उदाहरणच द्यायचे झाले तर अधांरात तेवनार्‍या दिव्या कडे पाहील्यावर तुम्हाला असे वाटते की त्या दिव्याची वात म्हणजेच सर्वकाही। पण त्या वातीला एनर्जी पुरवीनार्‍या तेला कडे तुमचे दुर्लक्ष होते. ते तेल म्हणजेच कदाचित अंतिम सत्याचा एक भाग आहे.


धर्माची व्याखा करायला मी कोणी मोठा ज्ञानी माणूस नाही। पण हे प्रश्न जेंव्हा सतावित असतात तेंव्हाच आपण "स्वतःला" ओळखन्याच्या मार्गावर चालन्यास प्रवृत्त होतो.


ॐ वाड़ मे मन्सि प्रतिष्ठिता

मनो मे वाचि प्रतिष्ठितमाविरावीर्म एधि

वेदस्य म आणीस्थः श्रृतं मे मा प्रहासी:

अनेनाधीते नाहोरात्रान्सन्दधाम्यॄतं वदिष्यामि

सत्यं वदिष्यामि तन्मामवतु

तद्वक्तारम्वतु अवत मामवतु वक्तारमवतु वक्तारम्

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:


अर्थात माझ्या वाणीचे मूळ माझ्या मनात असो आणी माझ्या मनाचे मूळ माझ्या वाणीत असो. हे ब्रह्म मला ज्ञान करुन दे. माझ्यात वेदांना (वेद म्हणजे ज्ञान) आणं. मी ऐकलेले कधीही विसरु नको असे कर. ह्या अभ्यासासाठी माझे सर्वस्व मी पणाला लावेन. मी शास्त्रसंमत व आचारसमंत सत्याचा अवलंब करेन. हे बह्म माझे रक्षण करो.
वेदांनुसार ब्रह्म म्हणजे काय हे पुढे कधीतरी ..

If you enjoyed this post Subscribe to our feed

2 Comments

  1. स्वाती आंबोळे |

    >> नुसत्या कर्मकांडावर आधारीत धर्म म्हणजे अंधश्रध्दा तर नुसत्या तत्वज्ञानावर आधारीत धर्म म्हणजे वैचारीक बुध्दीभेद वा नुसतेच वैचारिक तत्वज्ञान.

    अगदी पटलं.
    धर्म म्हणजे सत्य ही व्याख्याही आवडली.
    पण मला स्वत:ला त्यापुढे 'सत्य म्हणजे तरी काय? 'अंतिम सत्य' असं खरंच काही असतं का? असणं शक्य आहे का?' असे प्रश्न पडायला लागतात. :)

    आजच बघितला ब्लॉग - आता सावकाशीने सगळा वाचून काढेन.

     
  2. केदार जोशी |

    अगदी बरोबर. हाच प्रश्न मलाही पडतो. म्हणूनच ते रेसिपीचे व तेलाचे उदा. दिले.

    छांदोग्यपनिषदा प्रमाने सत्य म्हणजे आपण स्वतः. सत्य म्हणजे माती, सत्य म्हणजे ही अपान.
    पाण्या पासून हे जग कसे निर्माण झाले व बाह्य जग व आपले शरीर हे कसे एकच आहेत (म्हणजे विविध बाह्य गोष्टी व त्यांची आपल्या शरिराशी सांगड जसे अन्नाचे तिन भाग, त्यातल्या एकापासून आपले मन निर्माण होते, पाण्या पासून प्राण आणी वाणी पासून तेज.

    मी हे थोडे वरवर सांगीतले पण विद्वानांनी तपशिलात ह्यावर विचार वर चर्चा केल्या आहेत. काही भाग सोडला तर मला हे नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे की, शरिराचा इतक्या तपशिलात जर हिंदु तत्वज्ञान जात असेल तर, शरीर विज्ञान ते तेंव्हा किती प्रगत असेल.

    आरूणी ॠषी म्हणतात, की जसे अति ज्वराने आजारी पडल्यावर हळुहळू माणूस आपल्या आप्तस्वकियांना विसरतो व त्यांनी मी कोण ही कोण हे विचारल्यावर ही आपण ओळखु शकत नाही. जो पर्यंत वाणी मनात, मन प्राणात, प्राण तेजात व तेज परदेवतेमध्ये लीन होत नाही तो पर्यंत आपण जाणतो पण तसे झाले की आप्ण जाणत नाही. हे जे सुक्ष्म आहे, तोच आत्मा व तेच सत्य आहे. व तेच आपण आहोत व तेच सत्य आहे. (म्हणून आत्मसाक्षात्कार, माझ्या मते आत्माची स्व ला पटलेली ओळख व ती जाणिव म्हणजेच सत्य.)

    विचार थोडे इकडे तिकडे झाले असतील तो माझ्या बुध्दीचा दोष. कदाचीत ते मी निट मांडू शकलो नसेल पण ह्यावर एक ब्लॉग पुढे नक्की लिहीन.

    व्याकरणाच्या य चूका सर्व लिखाणात आहेत. :)

     

Post a Comment