रॅन्डम मेमरीज -६
Written on 1:56 PM by केदार जोशी
मधल्या काळात आमची क्रिकेट ची टिम मस्त तयार झाली होती. प्रत्येक जण आता मस्त खेळू शकत होते ही जमेची बाजू होती. नाहीतर लोक खेळायला येते असे म्हणतात आणि मैदानात काहीच करत नाहीत.
मला एक मॅच आठवते. आमच्या टिम ने मी ज्या कॉलनीत राहतो त्या टिमशी मॅच खेळायची ठरवले. त्या कॉलनीच्या टिममध्ये मी ही कधी कधी खेळायचो. बहुदा ही नववीची गोष्ट असावी. कॉलनीच्या टिम मध्ये काही मुलं कॉलेजला जाणारी पण होती. पण आम्ही ठरवीले की काही हरकत नाही, खेळून बघूया. शिवाय मी दोन्ही टिम कडून खेळनारा असल्यामूळे शाळेच्या टीम साठी इनसाईड इन्फो आपसुकच मिळत होती. मी तसे आमच्या टिमला सांगीतले ही. मॅच २१ रु ने घ्यायची ठरली. आम्ही सर्वांनी २, २ रु कॉन्ट्री मारले व यशवंत मैदानावर जरा लवकरच आलो. थोडावेळ प्रॅक्टीस केली आणी नंतर आमच्या कॉलनीची टिम आली. २० ओव्हर्सची मॅच ठरली. टॉस जिंकून त्यांनी बॅटींग घेतली. आणी मिल्याने पहिली ओव्हर टाकायला सुरुवात केली. पहिल्या ओव्हरपासूनच कॉलनीच्या टिमने आम्हाला बॉन्ड्री पार पाठवायला सुरु केले. मिल्याने १, रघ्या ने १, मी १, रव्या ने दोन अश्या विकेटस तर घेतल्या पण २० ओव्हर्स नंतर स्कोअर झाला होता ११८.मध्यंतर झाले व टिमच्या काही लोकांच्या लक्षात आले की आता आपण काही ११८ रन्स काढू शकत नाही. मी पेप्सी ( त्या काळी पेप्सी कोला नावाचे एक मेनकापडात गूंडाळलेली बर्फाची कॅन्डी मिळत असे, ती जबरी असायची, ५० पैशाला एक) घेन्यासाठी जाउन आलो तर टिमने निर्नय सांगीतला की न खेळताच पैसे त्यांना देउन टाकायचे व उरलेल्या वेळात मैदानात एक टिम खेळत होती त्यांचा सोबत मॅच घेऊन ती जिंकून पैसे वसूल करायचे. हा निर्णय मला जरी आवडनारा नसला तरी, माझ्या कॉलनीच्या टिमला जाऊन सांगावा लागला. आम्ही ती मॅच अर्धवटच सोडली. म्हणजे बॅटींग घेतलीच नाही व २१ रु देऊन टाकले. पुढे वर्षेभर तरी माझ्या कॉलनीच्या टिमचे लोक पळपुटे म्हणून मला चिडवायचे.पैदानात तीथेच आणखी एक टिम खेळत होती. त्यांना १० ओव्हरची मॅच ११ रु साठी खेळाल का असे कोणीतरी जाउन विचारले ते हो म्हणाले. आम्ही टॉस जिंकला व बॅटींग घेऊन १० ओव्हरस मध्ये ४५ रन केले. तेवढे रन आज कमी वाटत असतील पण तेव्हां खूप जास्त वाटायचे. विरोधी पक्षाला केवळ ३१ रन मध्ये आउट करुन ११ रु जिंकले. दिवस वसूल झाला. आम्ही य मॅचेस हारल्या व य जिंकल्या पण ह्या एकाच दिवशीच्या दोन मॅचेस मनात कायम घर करुन आहेत.
रघ्याने एके दिवशी शर्यत लावली की ह्या ओव्हर मध्ये निदान १० रन काढून दाखवायचे। मी ती स्विकारली. रघ्याच्या पहिला बॉल माझ्या पायावर आदळला. शून्य रन्स. दुसरा बॉल मी फ्रंटफूट वर खेळला, तरीही सरळ प्लेअर कडे शून्य रन्स. पहिले दोन बॉल असे गेल्यावर मिल्या मला चिडवायला लागला. मलाही जाम टेन्सन आले. म्हणंल शर्यत लावली तर झोकात पण चार बॉलमध्ये आता १० रन्स अवघड आहे. तिसरा बॉल मी परत फ्रंट फूट वर खेळून लाँग ऑन च्या दिशेने फेकला. बॉल बरोबरच बॅट च्या मध्ये लागला होता. टाईमिंग खूप अप्रतीम जमल्यामूळे तो सिक्स गेला. रघ्या तर चाट झालाच. पण मीही चाट झालो होतो. म्हणल, सटकेमे मटका. चौथ्या बॉल वर १ आणि पाचव्या बॉलवर दोन रन्स काढल्या. सहाव्या बॉलवर माझी विकेट पडली. शर्यत जरी जिंकली नाही तरी ती ओव्हर मला नेहमी आठवते. अझरने शारजाला, जडेजाने य वेळा, युवराजचे सिक्स स्किसेस, तेंडल्यांचे ब्रेट ली ला मारलेले तिन चौके ह्या सोबत मला माझा तो सिक्स आठवतो. त्या सिक्सने एक वेगळी जागा घेतली आहे.
बळवंत पाटील आणि अभोंरे असे दोन क्रिकेट मधील राक्षस 'ब' मध्ये होते। ते खरच चांगले खेळायचे. दोघांचेही बाप श्रिमंत असल्यामूळे त्यांचाकडे महागाच्या बॅटी होत्या. लाईटवेट पण मस्त. अंभोर्याची बॉलींग पण मस्त होती. दुधाटे नावाचा आणखी एक मुलगा त्यांचा टिम मध्ये होता. हे तिघ ज्या दिवशी एकत्र खेळायचे त्यादिवशी बहूदा जिंकायचेच. पाटील्-दूधाटे जोडी फूटायची नाही. मग आम्ही वेगवेगळे प्रयोग करायचो आणि तसे बॉल टाकायचो. एके दिवशी रव्याने मला फॉरवर्ड शॉर्ट लेगला उभे केले आणी जबरी बॉल टाकला. दुधाट्याने जोरात बॅट फिरवली व बॉल उडाला मी जिथे उभा होतो त्यापासून थोडा दुरच पडनार होता पण तो दिवस बहूदा माझा होता. एक जबरदस्त डाईव्ह मी मारली. पुर्ण अगं आडवे झाले व तो कॅच पकडला. खाली पडताना डोके मैदानावरच्या छोट्या दगडावर आदळले व रक्त देखील आले पण दुधाट्या आउट झाला होता म्हणून काही वाटले नाही. तो कॅच असाच नेहमी लक्षात राहील.
ह्या लोकांना आज जर हे सांगीतले तर त्यांना आठवेल की नाही हे माहीत नाही पण वरच्या तिन्ही चारी घटनांनी माझ्या मनात खोलवर कूठेतरी रजिस्टर झाल्या आहेत. त्या अचानक आठवतात.
शाळेच्या आठवनीत एका माणसांचा उल्लेख करावाच लागेल, तो म्हणजे इंटर्व्हल मध्ये ओले चने, फूटाने, खरमूरे विकनार्याचा। त्याचे नाव आता आठवत नाही. चेहरा मात्र अजुनही लक्षात आहे. त्याचकडे आमचे खातेच होते म्हणा. तो पैसे नसले तरी उधार खरमूरे देत असे. आता माहीत नाही तो जिंवत आहे का? खरमूरेच विकतो की काय करतो ते? पण त्यानेही एक वेगळा आनंद दिला आहे हे नक्की.
क्रमशः