रॅन्डम मेमरिज १

2

Written on 3:15 PM by केदार जोशी

लहानपणी च्या आठवनी हळू हळू धुसर होत चालल्यात। त्या काळी मजेशीर वाटनार्‍या गोष्टी आता तेवढ्या मजेशीर वाटत नाहीत हे खरेच पण त्याच गोष्टींनी तेव्हां आनंद दिला होता म्हणून त्याची परत उजळनी. मला खर तर इतर लोकांसारख शाळेतल सर्व आठवत नाही. पण जे काही रॅन्डमली आठवतंय ते लिहावे म्हणतोय. उद्या मी खरच भारताचा पंतप्रधान झालो तर पुस्तकं लिहीताना बरें. कसें? :)


हां। तर काय सांगत होतो की माझी सर्वात जूनी शाळेतली अजुनही लक्षात असलेली आठवन म्हणजे मिल्याचे अन माझे भांडन.



हा मिल्या (पक्षी, मिलींद देशपांडे) माझा लै म्हणजे लै जुना मित्र २ री मधाला. आमच्या दोघांचा उंचीमूळे शाळेत आम्हाला मागे बसविन्यात आले. दोघेही एकत्र बडबड करायचो. एके दिवशी बहुतेक जरा जास्तच बडबड वा आगावूपना केला. घोरबांड सरने उठा म्हणून सांगीतले. हा मास्तर मारकूट्या होता. कोणालाही मारायचा. त्याची एक वेगळी पध्दत होती, ती म्हणजे बोटांमध्ये पेन अडकवून वरची बोटं खाली दाबायची आणि खालची वर. च्यायला, जाम दुखायचं नंतर. पण त्याचीही सवय करुन घेतली पुढे. :) तर ह्या दिवशी मास्तर ने शक्कल लढविली व बाकावर उभे केले. मिल्या अन मि दोघेही उभे राहीलो. दोन पाच मिनीटांनंतर त्याने सांगीतले, 'आता तूमची शिक्षा म्हणजे तूम्हीच एकमेकांना थोबाडीत मारा'. ऐ जोशी तू मार रे पहिले असे ते करवादले. म्हणलं मारतो सर. मिल्याच्या जुन्या मैत्रीला जागून मी मिल्याचा थोबाडीत अगदी हळूच चापटी मारली. वाटलं मिल्याही तसेच करेन. अन तिझेच माझे चूकलेना भौ. मिल्याने मैत्रीला न जागता, जोरात माझ्या थोबाडित लावून दिली. गाल लाल लाल झाला असनार. त्याचा कडे रागाने पाहत खाली बसलो. म्हणलं साल्या तूला बघून घेतो आता. पुढे काय केले ते आठवत नाही पण नंतर मोठेपणी मिल्याने खुपदा मार खाल्ला माझ्याकडून. (ऑफकोर्स प्रेमातच).



मी आईच्याच, शिवाजी प्राथमिक शाळेत, पहिली ते चौथी होतो. ४ थीला पोफळे बाई विज्ञान शिकवायच्या. त्यांनी बहुदा मला बाष्पीभवन म्हणजे काय हे विचारले, मला पुस्तक घेतल्याबरोबर ती सर्व वाचून काढायची सवय होती, मग ते गणिताचे का असेना मी पुर्ण पुस्तकावर नजर फिरवायचोच. बहुदा ते बाष्पीभवन माझ्या लक्षात राहीले अन मी ते चटकन सांगीतले. पोफळे बाईंना माझ्याबद्दल आदर वाटला बहुतेक कारण त्यांनी अजुन बाष्पीभवन शिकवलेच न्हवते. लगेच त्या वर्ग अर्धवट सोडून आईकडे गेल्या व म्हणाल्या, 'मंगल, तूझ्या पोराला चौथी स्कॉलरशिपच्या परिक्षेला बसव', आईने फॉर्म भरला. अन परिक्षा द्यावी लागली. वेगळा अभ्यास केला का ते आठवत नाही पण तेव्हा चौथी बोर्डाला जिल्यात मी पहिला आलो. शाळेत अजुनही बोर्डावर जून्या हुशार विद्यार्थ्यांचा यादीत नाव आहे. माझ्या आयूष्यात पहिलेंदा व शेवट्यांदा मी जिल्ह्यात पहिला आलो होतो. शाळेने सत्कार केला व स्कॉलरशिप मिळाली.


तेव्हां नुकताच बालाजी आसेगावकर आमच्या वर्गात आला होता. चौथीला त्याची मुंज झाली होती. तो शाळेत ती काळी टोपी घालून यायचा. आम्ही (मी अन मिल्या) त्याची टोपी नेहमी उडवायचो. लगेच नंतर कधीतरी माझीही मुंज झाली पण लोक टोप्या उडवतात म्हणून मी तसाच शाळेत यायचो. टोपी न घालता. चिडवायला लोकांना काही मिळालेच नाही.

पुढं शाळा बदलली. त्याकाळी आमच्या शहरात 'पिपल्स हायस्कूल' ही शाळा फार गाजलेली होती. ती पाचवी ते दहावी होती. आई वडिलांनी मला त्या शाळेत घालायचे ठरविले. पण त्या शाळेत प्रवेशच मिळायचा नाही. एकेक वर्ष आधीपासूनच बहुदा शाळा 'बूक' असायची असे आम्हाला तेव्हां वाटले. माज्या मावशिचे यजमान देखील त्या शाळेत शिकवायचे. आठवडाभरच्या अथक मेहनतीनंतर मला त्या शाळेत प्रवेश मिळाला. आणी मी ५ वी 'क' मध्ये भरती झालो. दुसर्‍या शाळा सुरु झाल्या होत्या.


ही शाळा नविन, इथे लोकही नविन, कोणाची मैत्री नाही, अशा विचारात मी दुसर्‍या दिवशी ५ वी क मध्ये पाऊल ठेवले अन तिसर्‍याच बाकावर मिल्याला पाहीले। धत तेरेकी. च्यायला, ह्या मिल्याने मला का नाही सांगीतले ह्याचा राग आला पण तो विरघळूनही गेला.ह्या शाळेत परत एकदा मी आणि मिल्या होतोच सोबत. ही मोठीच जमेची बाजू होती, तसेच बोर्डात जिल्ह्यात पहिला आलाय, लक्ष ठेवा, मटेरिअल आहे. हे बहुदा आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्या वर्गातिल शिक्षकांना सांगीतले होते. त्यामूळे प्रत्येक शिक्षक त्या दिवशी येउन विचारी केदार जोशी कोण आहे? मग माझी वरात निघायची त्या शिक्षकापर्यंत. पण त्यामूळे एक बरे झाले की माझे नाव वर्गातील सर्वांना कळाले. व इतर लोक आपणहून माझ्याकडे आले. नंतर मला हे ही लक्षात आले की, शाळाच ५ वी पासून सुरु होते मग सर्वच जण नविन असनारकी. मग काय, नविन मित्र जमविने सुरु झाले.


तिसरे दिवशी एक बारिकसा मुलगा वर्गात उशीरा आला. त्याने पत्रकार घेतात तशी झोळीचे दफ्तर आणले पण ती झोळी उभी न घालता जानव्यासारखी घातली होती त्यामूळे तो अजुनच 'बाळू' दिसत होता. तो आला अन गपचूप आमच्या समांतर असनार्‍या बाकावर बसला. तिथे बसून त्याने एक वही काढली वर शिक्षक सांगतील ते टिपून घेऊ लागला. मधल्या सुटीत त्याला नाव विचारले. त्याने सांगीतले, 'रवि गोंधळेकर'. रव्या. मी, मिल्या, रव्या अशी जोडी नक्की झाली. बाकीचेही मित्र होते पण आता त्यांची दखल घेन्याइतके काही राहीले नाही. रव्या हूशार होता, मला लोकांनी हूशार केले होते आणि मिल्या ना धड हूशार, ना धड बुध्दू. अशी आमची जोडी अजुनही टिकून आहे. रव्याशी आता संपर्क कमी आहे पण अजुनही मित्रंच. ह्या तिघात आणखी तिन चारची मित्रांची भर पडली.



बालाजीला नंतर शाळेत पाहिले. त्याला विचारल्यावर कळले की ही त्याचाच वडिलांची शाळा आहे. आसेगावकर मास्तर शाळेत आहेत त्यांचे हे सुपूत्र. मिल्या अन मि थोडे घाबरलो होतो. वाटलं बालाजी आता बदला घेणार. पण तसे काही झाले नाही त्यामूळे बालाजी पण गँग मध्ये काठावरुन सामील झाला. काठावरुन का तर तो 'अ' मध्ये होता व आम्ही 'क' मध्ये. बाल्या हूशार होता ह्यात वादच नाही. आपण बरे, आपला अभ्यास बरे अशा घासू मुलात बाल्या होता. मास्तरांच नाव काढल पठ्याने. डॉक्टर झाला. कधी मधी भेटायचा पण आता आमच्या परदेशी असनार्‍या वास्तव्यामूळे कोणाचीच भेट होत नाही. बाल्याच्या गमती नंतर येतीलच.


पाचवी कधी गेली हे कळलेच नाही. मला पुढचे काही आठवत नाही.


नंतरची आठवन आहे सहावीची. तिथे आमच्यात दोन तिन साथीदार भरती झाले. पहिला होता. अन्या. अनिरुध्द असे चांगले नाव आहे त्यांच. अन्या थोडा घूमा माणूस आहे. अबोल. एकटाच राहनारा. पण आमच्यात मिसळला. शिन्या नावाचा (पक्षी: श्रिनीवास हरिपुरी) एक अफ्रिकेतल्या जंगलातला केसाळ प्राणि आमच्यात सामिल झाला. त्याचे केस म्हणजे काळ्या लोकांना जसे कुरळे केस असतात तसे आहेत. एकदम दाट अन कुरळे. रंग ही काळाच. त्यामूळे तो अफ्रिकन सफारीतला वाटायचा. शिन्या, अन्या, मिल्या, रव्या अन मी ही आमची कोअर टिम झाली. त्यातही शिन्या, अन्या अन मी व रव्या, मिल्या अन मी अश्या जोड्या होत्याच. ह्या दोघांना त्या दोघांशी जोडन्याचे काम माझेच होते अन अजुनही आहे. अन्या पण हूशार. त्याला कायम सगळ पाठं असायच. आमच्या पुर्ण ५ वर्षात 'क' हा वर्ग 'अ' आणी 'ब' पेक्षा पुढ होता त्याला कारण म्हणजे हे रव्या अन अन्या. एक दोन पोरीही हूशार होत्या पण त्यांचा नंबर ३ नंतर सुरु व्ह्यायचा, पहिले काही वर्ष म्हणजे सातवी पर्यंत मी देखील पहिल्या काही नंबरात यायचो. पण नंतर क्रिकेटचे वेड लागले ते अजुनही आहेच. अभ्यास वैगरे सर्व नंतर.


सातवीत असताना कधी तरी शिन्याला त्याचा आडनावा (हरिपूरी) वरुन सदाशिवने की तूझी पुरी हिरवी असेच काहीतरी चिडवले. शिन्या दिसायला जरी अफ्रिकन असला तरी वागायला अत्यंत साधू. अजुनही. गूनी माणूस. शिन्या कोपर्‍यात रडत बसला होता. हा शिन्या आहे तेलगू. पण ह्याला तेलगू निट येत नाही. घरचा कारभार मराठीतच. अन्याने मला सदाशिव बद्दल सांगीतले. तेव्हां आमच्या शाळेचे बांधकाम चालू होते, त्याचा विटा आल्या होत्या. सदाशिव फारच दंड पोरगा होता हे नक्की. तो लांबून नात्यात पण लागतो. तो त्या विटांपाशी मधल्या सुट्टीत खेळत होता. मी अन शिन्या तिकडे गेलो. त्याला काही बोलायची संधी द्यायच्या आत मी त्याला पोटात एक फाईट मारली आणी गचांडी धरली, म्हणंल, साल्या परत म्हणशील का काही? ओ ओ नाही नाही असे करत ते भांडन सूटले. शिन्याला कोणी काही म्हणने बंद केले. डायरेक्ट मारामारीची ती पहिली वेळ. नंतर बरेचदा कामाला आली. मी काही मारामार्‍या करनारा वा भांडनारा मूलगा न्हवतो. कधीच नाही. फक्त काही वेळा मात्र बिनधास्त मारामार्‍या केल्या आहेत. :)


सज्जनहो, ह्या लिखानात व्याकरणाचा चूका भरपुर असन्याची दाट शक्यता आहे. मराठी वाचनाशीच माझा जास्त संबंध आला. व्याकरनाशी नाही. तो भागही मी पुढे लिहीनार आहेच. तो पर्यंत ...

क्रमश:

If you enjoyed this post Subscribe to our feed

2 Comments

  1. निल्या |

    लय भारी !!
    आयला काय छान लिहिलं आहेस, सुसाट….असाच लिहित रहा. अरे काय इंटरेस्ट येतो महितंय वाचतान…
    सुपर…..ग्रामर जाउ दे *****.

     
  2. केदार जोशी |

    dhanyavaad abhijeet. :)

     

Post a Comment