रॅन्डम मेमरीज -९

4

Written on 11:19 AM by केदार जोशी

आमची ट्रिप डिसेंबर एन्डला गोव्याला जाणार हे ठरले. त्यात कोल्हापुर, पुणे ही पण ठिकानं होणार होती. शाळेत असनारी माझी मावस बहिन व तिचे वडिल त्या ट्रिपला जाणार होते. मग मी ही घरी सांगीतले की मला जायचे. घरुन नाही हे उत्तर आले. तसा इतक्यात हारनारा माणूस मी नसल्यामूळे त्यातल्या त्यात सॉफ्ट टारगेट म्हणून आई पाठीमागे रोज भूनभून चालूच ठेवली. हो, ना, हो असे होत आमचे गोव्याला जाणे नक्की झाले. शेवटच्या दिवशी फि भरली. फि होती ३५०/- रु फक्त. त्यात नविन कपडे घेने, वरखर्चाला पैसे असे काही न्हवतेच. ते पैसे वेगळेच. मग दोन नविन ड्रेस घेतले गेले, इतर काही सामान घेतले.

शाळेत सहल ह्या विषयाने जोर पकडला. जो तो सहली बद्दल बोलू लागला. कोण जाणार, कोण नाही ह्यावर चर्चा झाल्या. अन्या, मिल्या, रव्या, शिन्या हे सर्व घरीच राहनार होते, शिवाय ती पण न्हवतीच. माझ्या वर्गातील कोणीही येणारं न्हवत, कारण जास्त पैसे. मी थोडा हिरमुसलाच झालो. पण 'अ' मधील चांगला मित्र कमल्या व त्याचा लहान भाउ, संदिप, अभय वैगरे लोक असल्यामूळे तेवढ काही वाटंल नाही. मग सहलीचा दिवस उजाडला. शाळेत प्रत्येकाचे पालक सोडायला आले होते. गोवा हा टॉपीक इतका हॉट झाला की एका ऐवजी दोन बसेस शाळेने केल्या. आणखी दोन तिन मास्तर, मास्तरिन्या पण घ्याव्या लागल्या. कोणी कूठे बसायचे हे ठरवून दिले. आमच्या थ्री सिटर वर मी, कमल्या अन त्याचा भाऊ बसलो. आजूबाजूलाच आनंद वैगरे लोक होती. माझी बहिन आणी काका दुसर्‍या बस मध्ये असल्यामूळे आता मोकळं चाकळ बोलायला, वागायला कोणाची हरकत असनार न्हवती. बस सुरु झाली आणि थोड्याच वेळात गाण्याच्या भेंड्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरु झाला. मुलींच्या कडून दोन तिन ब मधल्या मुली भारी होत्या. एक आठवीतली मुलगी पण मस्त गायची. आता तिचे नाव आठवत नाही. माझ्या कडे तेंव्हाही गाण्यांचा भरपुर साठा होता. रात्री ११ वाजे पर्यंत खेळूनही कोणावरही भेंडी चढली नाही, तेंव्हा बोअर झाले म्हणून बंद करा असे एका खविस मास्तराने सांगीतले. हे मास्तर लोक म्हणजे एक तर म्हातारे असतात. त्यांचा काळात बहुदा मुल मुली एकत्र बोलत नसत, त्यामूळे त्यांना ह्या गमती जमती माहीतच नसतं. कधी न्हवे ते पहिल्यांदा शाळेतल्या मुलींबरोबर रात्रीही राहायची गमंत पोरांना सोडायची न्हवती. ( मला खात्री आहे की मुलींना पण तसेच वाटत असेल). अन हा खविस मध्येच बोलला. तो दिवस संपला.सकाळी कुठल्याश्या हॉटेल वर गाडी थांबली होती, व मास्तर लोक सगळ्यांना उठवून तोंड धूने, चहा नाश्ता करने असे काहीसे सांगत होते. मी अन कमल्या उठलो व फस्क्लास पोहे अन चहा मारला. एका मुलीला बहुतेक कमल्या आवडला होता की काय माहीत नाही पण ती देखील जवळ आली अन म्हणाली, 'कमलेश चहा झाला का? मी चाल्लेय तर आणून देते'. भोंदू कमल्यला ते काही कळाले नाही, अन ऋष्या त्याचाकडे पाहू लागला. तो नाही म्हणाला. बिचारी निघून गेली पण उत्साहाने गाडी सुरु झाल्यावर आमच्या जवळच्या सिट वर येउन बसली. आनंदने अन मी एकमेकांकडे नक्कीच पाहिले कारण नंतर दोन दिवस आम्ही तिच्यावरुन चिडवत होतो. थोड्यावेळाने कोल्हापुर आले बहुतेक. एवढे निट आठवत नाहीय आता पण दर्शन करुन आम्ही परत बस मध्ये आलो व एका जेवनावळी पाशी थांबलो. तिथे जेवन वैगरे झाले. आमच्या बहिनाबाई म्हणाल्या की तू त्या बस मध्ये थोडा वेळ येशील का?, तिच्या गँग मध्ये कोणाला मूकाअभिनय येत न्हवता. (मूकअभिनय म्हणजे डम्ब शराडस). मी हो म्हणालो व तिच्या सोबत गेलो. मग त्या बस मध्ये थोडा वेळ टाइम पास केला. बस बदली केल्यामूळे एक बरे झाले की बहिनीच्या सर्व मैत्रींनी एकदम खुलून बोलायला लागल्या. ह्याचा फायदा घेन्याचे ठरवले. :) डिडी पण होतीच. (डिडी कोण? हे माझ्या नोव्हें मधल्या शाळा लेखात वाचायला मिळेल). आम्ही असे मजल दरमजल करत आम्ही रात्री सावंतवाडीला पोचलो. तिथे पोचायला खूप रात्र झाली त्यामूळे जेवायला काही मिळालेच नाही. बस स्टॅन्डवर गाड्या उभ्या केल्या होत्या तिथे एक ऑम्लेटचा गाडा होता. बहिनीने व काकांनी ऑम्लेट खाउन घेतले पण मी काही अंडे खात न्हवतो त्यामूळे उपासच घडला. शाळेचा हलगर्जीपणा तेव्हां आवडला न्हवता. दोन्ही बसमध्ये ९० पोर होती. असे उपाशीच ठेवायचे म्हणजे कमाल आहे। दुसर्‍या दिवशी गोव्याला पोचलो. तिथे मग बीच वरच कूठल्या तरी फालतु हॉटेलात आमची रहायची सोय होती. हॉटेलातून बाहेर पडले की समुद्र. पण मास्तर लोकांनी परवानगी शिवाय हॉटेलाच्या बाहेर पडायचे नाही ह्याची सुचना दिली होती. एक दोन दिवस मग वेगवेगळे बीच बघने वैगरे झाले. ते फेमस चर्चही बघीतले. तिथे एक माणूस अत्तराच्या सहा बाटल्या अवघ्या ५ रुंना विकत होता म्हणून मी आणि बहिनीने विकत घेतल्या. नंतर घरी आल्यावर कळले की ते रंगीत पाणिच होते बाकी काही नाही. चर्च मधील अनेक वर्षाचे प्रेत पाहिले व प्रश्न पडला की काय गरज आहे प्रेत तसेच ठेवायची? बिचार्‍याला देहभोग अजूनही आहेतच. असो तो भाग वेगळा. रात्री मसाला पाणं खायला मी अन कमल्या गेलो. डिडीला सुगावा लागला व ती माझ्या पाठीमागे आली. तिने मलाही पान आणायला सांगीतले. मी तिला मसाला पान आणून दिले ते काही मुलींनी पाहीले. मग पुढचे दोन चार दिवस त्या उगीच आम्हाला चिडवत होत्या. मुलांनी पण विचारले की तूझी एवढी ओळख कशी काय की तू पान बिन पण तिला नेउन देतोस? काय उत्तर देनार? चार दिवस उगीच लोक चिडवत होते. ते ऐकून घेतले. पण डिडीचा आणि माझा दोस्ताना ह्या ट्रिप मूळे वाढला होता हे नक्की. जेवायला सोबत जाने, चहा वैगरेची देवान घेवान इ इ गोष्टी आमच्यात होत होत्या. आणि बहिन सोबत असल्यामूळे सर लोक काही बोलायचे नाहीत. मलाही ही नेमके कळेना की डिडी मला आवडतेय की ती? तिच्याबाबत पुढे काहीही होत न्हवतेच. मग नक्की काय? शेवटी दोघींबाबत काहीही झालेच नाही ही गोष्ट निराळी. पण तेव्हा माझ्या मित्राने योग्य वेळी जर माघार घेतली असती तर नक्कीच मी डिडी बाबतीत काही केले असते असे कॉलेज मध्ये अनेकदा वाटले. पण काही झाले नाही तेच बरे झाले असेही वाटते. ती फारच फॉर्रवर्ड होती. १२ वीत ती सिगरेट पिते असे ऐकले होते, खरे खोटे तिलाच माहीत.

बस मध्येच सर्व मुल कपडे वाळायला घालीत. दोन दिवस चांगल्या असनार्‍या बसमध्ये नंतर कोणाला चढावेसे वाटत न्हवते. पोराच्यां बन्यनी, चड्या वैगरे वरच वाळू घातलेल्या होत्या. आणि मुलींना तसे करता येत न्हवते पण त्यांचा सर्व बँगाना एक वेगळाच ओलसर वास येत होता. आमच्या घरच्यांनी ती भानगडच ठेवली नाही. मला तिन-चार आतल्या कपड्यातील जोड दिले होते, त्यामूळे माझी बॅग किंवा सिट ओली न्हवती. पण सर्व बॅस मध्ये घाण वास भरुन होता. घरुन निघताना वडिलांनी मला ७५ रु दिले होते. कमल्याला त्याचा वडिलांनी ५० रु दिले होते. ते त्याने कागदी पागटीत ठेवले होते. एके दिवशी त्याचे पाकीट सामान काढताना खाली पडले. ते मला सापडले. उघडून पाहीले तर ५० रु. मला ते ठेवताही आले असते कारण तेंव्हा बस थांबलेली होती व तिथे माझ्याशिवाय कोणीही न्हवते. पण मी सरळ कमल्याला वापस केले. काकांनी फोकाने बडवल्यामुळे ते पैसे आपण घ्यावेत असा विचारही शिवला नाही.
मास्तर लोकांनी गोव्यातून बहूतेक फेनी घेतली। वापस येताना गाडी खाली एक कुत्रे आले, पोलींसानी गाडी थांबवली तर ह्या मास्तर लोकांनी फेनीच्या बाटल्यांपैकी एक -दोन पोलीसांना दिल्या.
भ्रष्टाचार येथून रुजतो तर.

३१ डिसे च्या रात्री आम्ही पुण्याकडे रवाना झालो. रात्री आम्हाला काही तरी देन्यात येईल असे घोषीत झाले. ११.१५ च्या सुमारास बस थांबली म्हणून जाग आली तर मास्तर म्हणाले, थोडा वेळ झोप आणी १२ वाजता उठ. मला काही जाग आली नाही. कमल्याने दुसर्‍या दिवशी सांगीतले की गोळ्या वाटल्या. भेंडी, गोळ्या खायला रात्री १२ वाजता उठायचे काय? अस्सा राग आला होता आम्हा सर्वांना. अन काही मास्तर लोकांनी मात्र फेनीचा आस्वाद घेतला अशी अफवा पण उठली होती.

आम्ही पुण्यात येउन पोचलो। जेवून सारस बागेत आम्हाला नेले. तेथे गणपतीचे दर्शन झाल्यावर घोषना केली की ज्यांचाकडे ५० रु च्या वर आहेत तेच लोक पुण्यातील प्रसिध्द अश्या खरेदीच्या ठिकानी म्हणजे तुळशी बागेत जातील. माझ्याकडे, कमल्याकडे, आनंदकडे, डिडी कडे, संगिता कडे ५० रु न्हवतेच. आम्ही मग तिथेच गप्पा मारत बसलो. बरीच जनता मागे उरली व बरेच जण गेले. बहिनाबाई गेल्या. आम्ही मस्त पैकी गप्पा मारल्या व गाण्याच्या भेंड्या खेळल्या. तिथे एक काकडी विकनारा माणूस होता. कोणीतरी काकडी विकत घेतली. साल काढलेली, मधोमध चिरुन चार उभ्या फोडी करुन तिखट मिठ लावलेली काकडी खाणे हे तूळशी बागेत जाण्यापेक्षा नक्कीच बरे वाटले.

दुसर्‍या दिवशी सिंहगडावर गेलो. तिथे बैनवाड मास्तरला चकवा लागला असे पोर म्हणाले. आम्ही काही जण मस्त पटपट वर चढून गेलो. जाताना उरलेल्या ७-८ रु तून ताक वैगरे पिले. इथे एक गोष्ट घडली ती माझ्या लक्षात नेहमी राहीन. ह इथले जेवन स्वतःच्या पैशाने घ्यायचे असा अचानक फतवा निघाला. सिंहगडावर झूनका-भाकरी मिळते. सर्वजन ती मस्त पैकी खात होते. माझ्याकडे जास्त पैसेही राहीले न्हवते. बहिन व काका झुनका-भाकरी खात होते पण काकांनी मला काही विचारले नाही की तू खाणार का? त्यांचा मुलीसारखास मी पण त्यांचा कोणी तरी होतोच. मग एक भाकरी मला घेउन न द्यायला काय झाले? शिवाय वर त्यांनी मला विचारले होते की तू जेवलास का? मी त्यावर नाही म्हणालो होतो आणी आदल्या दिवशीच तूळशी बागेत मला पैसे नसल्यामूळे जाता आले नाही हे ही त्यांना माहीती होतेच. बर्‍याच वेळा नंतर बहिनीने विचारले की जेवन झाले का? मी म्हणालो पैसेच नाहीत जास्त. कमल्याकडेही पैसे न्हवतेच. मग आमच्या दोन तिन मित्रांनी मिळून एक दोन प्लेटी जास्त आणल्या व त्यातली अर्धी अर्धी भाकर आम्ही खाल्ली. काकांनी तसे कदाचित पोरांच्यावर लक्ष देन्यामूळे केले असेल पण तो घाव आहे तो आहेच. इतर अनेक घांवासारखा. तेंव्हा कळले, "नातेवाईकांपेक्षा मित्र जवळचे असतात."मग आमची वरात परत बसकडे व तेथून आमच्या शहराकडे वापस निघाली. येताना नंतर कूठल्याशा गावी थांबून सर्वांना खिचडी खायला घातली व शाळेपाशी गाडी आली. सर्वांचे पालक घ्यायला आले होते.
ट्रिप संपली होती पण काही नविन प्रश्न ट्रिप व्यवस्थापणा बाबत निर्मान झाले, जसे दोन वेळा बरेच जन उपाशीच राहीले वैगरे। त्यावरुन काही काळ रण माजले होते. पण काही मास्तर लोकांनी त्या पैशात काजू व फेण्या नक्कीच घेतल्या असे तेंव्हा मात्र वाटले होतेच.

क्रमशः

If you enjoyed this post Subscribe to our feed

4 Comments

  1. Anonymous |

    ekdam mast... vachat aasatana maz balpan aathaval..
    hya dhavatya vishvat bhutakalatle soneri kshan aathavayachi velach nahi milat,pan aaj matra baryach goshti manachya smruti patala var umatat hotya, thoda vel kahi hoeena pan ek vilakshan aanad det hotya..
    Dhanyavad ani krupaya aasach lihit raha...

     
  2. केदार जोशी |

    धन्यवाद मित्रा.

     
  3. नितिन चौधरी |

    Ekdam bes ahe samda..
    Ajuk nahi liwnar ka?

     
  4. Sonal |

    झकास!

     

Post a Comment