"स्वदेशी" विचार खरा जनक कोण?

3

Written on 2:34 PM by केदार जोशी

स्वदेशी विचाराचे आणी चळवळीचे जनक म्हणून महात्मा गांधीना पाहीले जाते। ते खरोखरच ह्या विचाराचे जनक आहेत का? की ह्या विचाराचा जनक दुसराच कोणीतरी आहे ह्या बाबत मी शोध घेत होतो. आणि अहो आश्चर्यम. मला बहुदा ह्या विचाराचा जनक सापडला.

वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी "स्वदेशी" वापर करा हा विचार मांडनारा फटका लिहनारा बालक होता विनायक दामोदर सावरकर। त्याने हे पत्र प्रसिध्द ही केले होते. ह्या पत्राअंतर्गत त्याने लोकांना स्वदेशी वापरन्याची महती सांगीतली व विदेशी गोष्टी सोडून स्वदेशी आग्रह केला. ह्या फटक्यात लेखकाने जनमाणसांतील विर वृत्तीला जूने वैभव सांगून जागृत करन्याचा प्रयत्न देखील केला.

लिखान साल १८९३
गांधीजी सन १८९३ ते १९१४ अफ्रिकेत असल्यामूळे भारतातील घडामोडींचा अंदाज त्यांना न्हवता तसेच तेंव्हा त्यांनी समाजकारनासाठी जिवन व्यतीत करायचे का नाही हे ही ठरविले न्हवते. शिवाय १९०५ मध्ये ही बंगालात, बंगाल फाळनी झाल्यावर मोठ्या प्रमानावर विदेशी वस्त्रांची होळी झाली होती. त्या काळी पंजाब, महाराष्ट्र व बंगालच्या मातीतून क्रांतीकारक जन्मले व समान विचारांच्या युवकांनी ह्या तिन्ही राज्यात धूम केली होती. सावरकरांनी इंग्लडात शिकत होते तेंव्हा भिकाजी कामा, वर्मा, बापट व इतरांसोबत स्वदेशीची पत्रके गुप्तरितीने भारतात पाठवीली होतीच, त्यामूळे नायरांसारखे इतिहासकार असे मानतात की सावरकरांच्या अश्या पत्रंकामूळेच दक्षिन भारतात स्टूंडट अनरेस्ट सुरु झाली.

१९०५ मध्ये तर गांधी भारताच्या राजकिय पटलावरही न्हवते पण स्वदेशी चळवळीचे श्रेय त्यांनाच दिले जाते. का बरें? महात्मा गांधीनी तूकारामाचे विचार लोकांना सांगीतले हे आपणाला माहीत असेलच, त्यांचा वैचारिक विरोध करनार्‍या स्वातंत्र्यविराचा विचार ही त्यांनी पुढे नेला, पण योग्य ते श्रेय त्यांना दिले नाही.गांधी ग्रेट की सावरकर ह्या या लेखाचा मुद्दा नाही. दोघेही ग्रेटच आहेत.

पण मग गांधीनी ही गोष्ट आम जनतेला का नाही सांगीतली हा आमचा सवाल?
ह्यावर अजुन संशोधन करुन इतिहासकारांनी योग्य ती दखल घ्यावी व योग्य तिथे इतिहास निट लिहीला जावा असे मनापासून वाटते.

हा घ्या पुरावा.
"देशी फटका'लिखान साल १८९३

आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा
हटा सोडनी कटा करुया म्लेंच्छ पटां ना धरु कदा ।।१।।
काश्मीरच्या शाला सोडिनु अल्पाकाला कां भुलतां?।।
मलमल त्यजूनि वलवल चित्ती हलहलके पट कां वरितां?।।२।।
राजमंहेद्री चिटा त्यजुनि विटके चिट हे कां घेतां?।।
दैवे मिळता वाटि, इच्छितो नरोटि नाही कां होता! ।।३।।
येविल सोडिनु पितांबरांना विजार करिन्यांसाठि महा ।।
बेजारचि तुम्ही नटावयामधि विचार करितो कोणि न हा ।।४।।
केलि अनास्था तुम्हिच स्वत: मग अर्थातच ती कला बुडे
गेले दिन हे नेले हिरूनी मेले तुम्हि तरि कोण रडे? ।।५।।
अरे आपणच होतो पूर्वी सर्व कलांची खाण अहा ।।
भरतभूमिच्या कुशीं दिप ते कलंक आतां आम्ही पहा ।।६।।
जगभर भरुनी उरला होता नुरला आतां यापार ।।
सकलहि कलाभिज्ञ तेघवां अज्ञ अतां अरिही थोर ।।७।।
निर्मीयली मयसभा आम्हिच ना? पांडव किरीटी आठवारे ।।
मठ्ठ लोकहो! लाज कांहितरी? लठ्ठ असुनि शठ बनलोरे ।।८।।
आम्रफलाच्या कोयीमध्ये धोतरजोडा वसे सदा ।।
होते जेथे प्रतिब्रम्हेंची धिक मी जन्मुनि अपवादा ।।९।।
हे परके हरकामीं खुलविती भुलविती वरवर वाचेने।।
यवहार रीती ऐशि बरोबर सदा हरामी वृत्तीने ।।१०।।
कामधेनुका भरतभूमिका असूनि मग कां ही भिक्षा
सहस्त्र कोसांवरुनि खासा पैका हरतो प्रभूदिक्षा ।।११।।
नेती कच्चा माल आमुचा देती साचा पक्व रुपे ।।
आमुच्या वरतीं पोट भरीति परो थोरि कशाची तरी खपे ।।१२।।
पहा तयांची हिच रित हो! भिती नसे त्या लबाडिला ।।
नाना कर्मे नाना वर्मे देश आमुचा लुबाडिला ।।१३।।
निमुली हातामधलीं फडकीं फडकत नाना ध्वज वरतीं ।।
हडलहप्पसे करुनि शिपाई निघत स्वारी जगभर ती ।।१४।।
नाना परिचे रंग भरीती रंग पुंप ते दंग करी ।।
मोर, कावळे, ससे, पारवे, श्वापद विचरती तीं बकरीं ।।१५।।
राजगृहीं गोपुरी झळकती मजले सजले त्यामधुनी ।।
सुंदर नारी दु:ख हर्ष भरि त्या बघित शोभा तरुणी ।।१६।।
नाना जाती पिकली शेती गार हिरवे वस्त्र धरी ।।
भात बाजरी गहूं गाजरी आच्छादली हि भूमि बरी ।।१७।।
अगनग गेले गगन चुंबिण्या सर्व थोरबहु कोराकि ।।
भास पुरुषची निजांकि बसवी स्वानंदाने पोरां की ।।१८।।
चित्र ऐशीं दाविति छत्रे विचीत्र तूम्हा भुल धंदा ।।
तुम्हिंहि भुलतां पहातां घेतां क्षणांत स्वपटाला निंदा ।।१९।।
याला आतां उपाय बरवा एकी करवा मन भरवा ।।
ओतप्रोते अभिंमाने हरवा देशी धंदे पट करवा ।।२०।।
परके वरवर कितीहि बोलती गोड गोड तरि मिनं समजा ।।
सुंदर म्यानीं असे असिलता घातिच होइल झट उमजा ।।२१।।
रावबाजि तरि गाजि जाहले राज्य बुडालें तरि मुख्य ।।
सख्य असे परि परकीयांचें गोष्ट ऋदयिं ही धरु लख्ख ।।२२।।
वैर टाकुं या यास्वत लौकर खैर करो परमेश्वर ती ।।
निश्चय झाला मागें अपुला परदेशी पट ना धरती ।।२३।।
चला चला जाउं या घेउं या देशि पटांना पटापटा ।।
जाडे भरडे गडे कसेही असो सेवुं परि झटाझटा ।।२४।।
ना स्पर्शू त्या पशूपटाला मउ वरि विखार तर भावूं ।।
घेऊं खडतर अंतीं सुखकर धर्मचि मानुनियां राहूं ।।२५।।
द्रव्य खाणि हि खोरे घेउनि परकीपोरें खणतिरें ।।
एकचिंत करुनियां गड्यांनो! वित्त जिंकूया पुररपिरे ।।२६।।
विश्चेश्वरि ती नारायणि ही यमहरि हर अदि सुरवरिणीं ।।
कर्म सिध्दीसी दावो नेउनि मोद देति निज भक्त जनीं ।।२७।।
दर अज्ञानी रजनी जावो सांग प्रकाशो रविज्ञान ।।
वरावयाला रत्न पटांनां करो आर्य ते रणदान ।।२८।।
कवितारूपी माला अर्पी आर्यं बंधुसीं सार्थक हो ।।
भक्तांकरवी मन देवांसी सेवा त्याशीं अर्पण हो ।।२९।।

स्वांतत्र्यविर सावरकर

If you enjoyed this post Subscribe to our feed

3 Comments

  1. Unknown |

    Va sundar lekh aahe. Swatatraveeranche mahatmya gaave tevdhe kamich. Vayachya dahavya varshi jo koni yachi kalpana karu shakto, toch khara swatantraveer. Majha swatantryaveeranna manacha mujara.

     
  2. Anonymous |

    गांधी व सावरकर तुलनाच होऊ शकत नाही. सावरकरांनी नि:स्वार्थपणे देशाचाच विचार केला. त्यांनी स्वत:ला महत्व दिले असते तर आज नोटांवर तेच दिसले असते .

     
  3. Unknown |

    अगनग गेले गगन चुंबिण्या सवे थोर बहु कोरांकी
    या ओळीचा अर्थ कुणी सांगेल?

     

Post a Comment