अहिंसा म्हणजे नक्की काय?

3

Written on 9:36 AM by केदार जोशी

अहिंसा म्हणजे नक्की काय?अहिंसावादी म्हणजे काय?
हे गहण प्रश्न मला आजकाल पडले आहेत. "मी अहिंसावादी आहे", असे जेंव्हा कोणी म्हणतो तेंव्हा त्याला नक्की काय अभिप्रेत असते हे मला अजुनही कळत नाही.


मला अभिप्रेत असलेला अहिंसेचा अर्थ.

अहिंसा व अहिंसावाद - मी कोणाचीही कारण नसताना हिंसा करनार नाही. पण कोणी माझी किंवा माझ्या स्वकीयांची (देश) विनाकारण हत्या करत असेल तर माझ्या अहिंसावादात त्याची हत्या करणे वा त्याला प्रतिरोध करने हे माझे आद्य कर्त्यव्य असेन. स्वसंरक्षण म्हणजे हत्या असे मी समजत नाही. पण त्याच वेळेस मी दुसर्‍याची विनाकारण हिंसाही करनार नाही.


उदाहरणच द्यायचे झाले तर शिवाजी महाराजांनी राज्य स्थापण केले ते काही अहिंसेच्या बळावर नाही तर, स्वकियांचे रक्षण करन्याकरता हिंसाही केली. मग त्याला तूम्ही काय म्हणाल? ते हिंसक होते हे लेबल तूम्ही लावाल काय?
इतिहास पाहील्यास सम्राट अशोक व सम्राट हर्षवर्धण हे बौध्द सम्राट हिंसेच्या जोरावर अहिंसा लादत होते. अनेक भारतीय संधराज्यांवर त्यांनी चाल केली व घशात घातले। त्या सैन्यबळावर त्यांनी धर्म प्रसार करुन विरोधी राजांना नामशेष केले। कित्येक छोट्या मांडलिक देशांनी त्यांचाकडे असलेल्या सैन्याचा त्याग केला कारण अहिंसा ह्या विचाराचा पगडा त्यांचावर होता. त्या १५० वर्षात भारताची उत्तर बाजू अहिंसेच्या पगड्याखाली आली व परिनामी हूण, कुशान, शकांचे आक्रमन झाले. ते थोपविता आले नाही व त्यांचे राज्य उत्तर भारतावर आले. मधल्या काळात ह्यांचे पारिपत्य करन्यासाठी विक्रमादित्य, गौतमीपुत्र सातकर्णी, सम्राट पुष्यमित्र हे शांतताप्रिय पण स्वकीयांचे रक्षण करनार्‍या राजांनी ह्या आक्रमकांपासून आपली सुटका केली.त्याही नंतर भारतावर मुस्लीम राज्य आले कारण त्याला आपण निट विरोध करु शकलो नाही. हे सर्व लिहीन्याचे कारण की आपल्याकडे अति अहिंसेची इतिहास असताना, आपण त्यातुन काही शिकनार आहोत की नाहीत?

स्वसंरक्षन आणी मुद्दाम केलेली हिंसा हा फरक तेंव्हाही समजला नाही व तो आजही लोक समजुन घेत नाहीत. अहिंसावादी आणी स्वरक्षनवादी ह्याचात हे युध्द गेले २००० वर्ष चालू आहे.

आजकाल मुंबईच्या पार्श्वभूमीवर अनेक ब्लॉग व लेख वाचले त्यात काही जणांनी अहिंसेने हा प्रश्न सोडवावा असे लिहीलेले आहे. आपल्यापैकी बरेचजण मी अहिंसावादी आहे असे म्हणतात तर त्यांना हे म्हणन्यापाठीमागे काय अभिप्रेत आहे हे मला अजुन निटसे उमजले नाही.

अहिंसाप्रिय, अहिंसक असे शब्द योजन्या पेक्षा आपण शांतताप्रिय असे शब्द योजायला हवेत.

तुम्ही कोण? अहिंसावादी की शांतताप्रिय. पण ती शांतता कायम राखन्यासाठी सुसज्ज असनारे?

If you enjoyed this post Subscribe to our feed

3 Comments

  1. Dinesh Gharat |

    अहिंसा म्हणजे, गांधीने देशाला जे सांगितले ते. काही झाले तरि हिजड्या सारखे वागा.
    कोणी एका गालावर मारले तर दूसरा गाल पुढे करा. दुसर्‍या गालावरही मारली तर पाठ पुढे करा. पाठीवर मारले तर, पोटावर मारु द्या.
    शत्रुने गांX मारली तरि मारु द्या.

     
  2. केदार जोशी |

    एका गालावर मारा आम्ही दुसरा गाल पुढे करु हे गांधीनी नाही सांगितले तर येशूने सांगीतले. गांधीनी उलट हे एका इंग्रजी माणसाला विचारले की तूमच्या धर्मात तर अशी शिकवन आहे मग तूम्ही का अत्याचार करता? नंतर भलतेच छापले गेले.
    अहिंसा विचाराचा त्यांनी अतिरेक केला हे खरय पण सैन्याबाबत त्यांची भूमीका काय होती ह्या बद्दल जास्त माहीती नाही. पहिल्या भारत्-पाक युध्दाला त्यांनी विरोध केला होता हे मात्र सत्यच आहे.
    आद्य फॉलोअर विनोबा भावे हे मात्र सैन्यविरोधी होते. जर त्यांचे ऐकले असते तर आपल्याकडे सैन्यच नसले असते. ऑफकोर्स त्यांनी भिती आणि सैन्य अशी तुलन केली पण नंतर ते "सैन्य नको" ह्या भुमीकेवर कायम राहिले. पाक आणी चिन सारखे मित्र असताना सैन्य नसले असते तर काय झाले असते ह्याचा विचार ही न केलेला बरा. अगदी ह्याच कारणामूळे मी ते अशोकाचे उदा. दिले.

    सध्याचे गांधीचे फॉलोअर्स म्हणून म्हणवून घेनारे पण त्यांचा विचारांनी न चालनार्‍यांनी ही घाणं जास्त करुन ठेवली आहे असे वाटते.

    मित्रहो, भाषा थोडी संयत ठेवा.

     
  3. Anonymous |

    People who post obscene comments about Gandhiji almost always belong to brahmin caste. There is a historical reason.

     

Post a Comment