रॅन्डम मेमरिज -२

0

Written on 1:11 PM by केदार जोशी

आमची शाळा म्हणजे मूर्तीमंत पार्शलिटी असेच वर्णन आम्ही करायचो.

पाचवीत जेव्हां प्रवेश घेतला तेव्हां शाळेकडे नविन वर्गच न्हवते म्हणे! मग त्यांनी काय शक्कल लढवावी? तर शाळेचे म्हणून जे मैदान होते तिथेच तात्पुरते वर्ग उभे केले. तट्टे आणि पत्र्यांचे. आणि सर्व 'क' आणी 'ड' तूकड्यांना तिकडे बसायची सूवर्णसंधी उपलब्ध करुन दिली. हे पाच सहा तट्ट्याचे वर्ग म्हणजे धिंगाना करन्याची जनू पर्वनीच. माझ्यातला 'अभ्यासू' केदारला तात्पूरते म्हणजे १० वी पर्यंत मारन्याचे कार्य निश्चीतच ह्या वर्गांनी केले. मूळातच मी उचापती माणूस. चार लोक मिळाले की बांध संघटणा, हे तेथूनच चालत आले आहे. मग काय ऑफ पिरेड मध्ये ते तट्टे फाडून टाकने, त्यातून छिद्र तयार करने व दुसर्‍या 'ड' वर्गातील मूलांशी खूश्कीचा मार्ग बांधने ह्याची जबावदारी मित्रमंडळाने माझ्यावर टाकली। ती जवाबदारी मी व आणखी एका सहकार्‍याने विना तक्रार स्विकारली व यशस्वी पणे पार पाडली. त्याच वर्गात आम्ही चार-पाच वर्ष काढली. वाटल तो पर्यंत तरी शाळेत आमच्या नावाचे वर्ग तयार होतील पण नाही. त्या तयार वर्गात बसन्याच्या जन्मसिध्द हक्क फक्त सर्व वर्गांचा 'अ' आणि 'ब' तूकड्यांनाच होता असे दिसते. पण १० वी ला मेरीट मध्ये मात्र 'ड' मधिल मूलगी आली. तसेही 'अ' वाले फार सोवळे आहोत असे दाखवायचे पण कूठल्याही कार्यक्रमात त्यांचा पहिला नंबर कधीही आला नाही. वक्तृत्व आणी निंबधलेखण मध्ये बरेचदा आमची तूकडी पहिली तसेच क्रिकेट मध्ये आमचीच टिम पहिली यायची.


शाळेचे मैदान अश्या रितीने वापरल्यामूळे खेळाच्या तासाची बोंबच झाली. शाळेच्या पाठीमागे रेल्वेस्टेशन आहे. रेल्वे बोर्डाची एक पडिक जमीन मग शाळेने मैदान म्हणून वापरले ते ही आमच्या १० वी पर्यंतच नंतर रेल्वेने मनाई केली. आधी लिहील्याप्रमाने वर्ग तट्याचे असल्यामूळे, पिरेड चेंज होताना जर पळून जावे वाटले तर खूशाल तट्टा वर करायचा व रेल्वे ग्राऊंड कडे पळ काढायचा. मुख्य रस्ताने जायची गरजच न्हवती. आणी वर्गात बसल्यावरही लक्ष सारखे त्या रेल्वेच्या मैदानाकडेच असायचे सर्वांचे कारण कूठल्याना कुठल्या तूकडीचा खेळायचा तास असायचा. मग आम्ही तिकडे टक लावून बघत बसायचो.


एकदा, बहुदा सहावीत किंवा सातवित गणिताचे मास्तर कुठलातरी प्रमेय सांगत होते. त्रिकोन काढते वेळी मी आवाज काढायला सुरु केली. म्हणजे त्या सरांची त्रिकोन किंवा चौकोन काढायची एक विशीष्ट पध्दत होती. आधी ते फक्त फळ्यावर टिंब काढीत मग ते जोडीत. त्यांनी एका टिंबापासून दुसर्‍या टिंबापर्यंत रेषा काढायला सुरुवात केली की मी उंsssउं असा आवाज काढायचो. दोन तिनदा त्यांना बिलकूल लक्षात आले नाही. नंतर हरिष नावाच्या पठ्याने त्यांना सांगीतले की मी तो आवाज काढतोय. त्यांनी एक तूटलेला लाकडी बेंच होता त्याची फळी काढली व आमची स्वच्छ व यथेच्छ धूलाई केली. वर आता माझ्या गणिताचा तासाला कधीही बसायचे नाही असे फर्मान काढले. मी निर्लज्ज पणे, चालेल सर, हो सर, असे उत्तर दिले व मार खुप बसल्यामूळे सुट्टी घेउन घरी निघून आलो.


घरी येतानाचा डोक्यात चक्रे सुरु झाली. हर्‍याला बदडायचा. मग निवांतपणे दोन चार दिवस जाउ दिले. हर्‍या शाळेपासून जवळ राहायचा. एके दिवसी मोर्या (म्हणजे मोरे) म्हणला की आपण हर्‍याकडे डब्बा खायला जाऊया. शिन्या म्हणाला हिच संधी आहे केद्या साधून घे. हर्‍याच्या घराजवळ जाताना एक गटार लागते. ते सर्वकाळ उघडेच असायचे. हर्‍यासोबत घरी तर निघालो पण गटार आले की त्याला तिथे ढकलून दिला. ते गटार खोल न्हवते, नाली होती. पण काळे पाणि सगळीकडे साचले होते. हर्‍याचे कपडे काळे झाले आणी तो रडायला लागला. तिथेच त्याला मी अन शिन्या बूकलत होतो, पण नंतर दया येउन सोडून दिले व त्याला वर काढले. हर्‍याला आणि मोर्‍याला कळले की मी अन शिन्या असे का वागलो ते. नंतर ते दोघेही आमच्या वाटे जाईनाशे झाले.


इतर वेळी आपण बरं, आपल्या थोड्याफार खोड्या बर्‍या आणी कधी मधी केलाच तर अभ्यास बरा असे आमचे वागने होते। क्रिकेटचा नाद मला, मिल्याला व रव्याला प्रचंड होता. रव्याचा थ्रो पार लाबूंन देखील स्टंप पाशी यायचा. त्याचा आर्म आणी स्पिन बॉलींग सॉलीड होते. आम्ही तेव्हां प्रोफेशनल क्रिकेट खेळायचो. म्हणजे मोठ्या मैदानात जाऊन. आमच्या शहरात यशवंत कॉलेज नावाचे एक महाविद्यालय आहे. त्यांचे मैदान हे खुप म्हणजे खूपच मोठे आहे. सर्व लिग्ज तिथे खेळायच्या. नाही म्हणलं तरी निदान ५० यार्डाची बॉन्डी असेनच. तिकडे लॉन्ग ऑन ला रव्या थांबायचा, नाहीतर त्याची दुसरी जागा म्हणजे फॉरवर्ड शॉर्ट लेग. जबरा फिल्डींग करायचा. आधी लिहील्याप्रमाने तो खूपच बारीक होता. पण थ्रो म्हणजे राजे उच्च होता उच्च. उजव्या हाताने तो थ्रो करताना शरिराला एक हलकाचा लचका देउन वर उचलायचा, मग डाव्या पायाने दोन छोट्या उड्या घेत तो थ्रो करायचा. त्याचे पाहून मी ही तसे करायचा प्रयत्न करायचो, पण नाही जमायचा. मिल्या म्हणजे फास्ट बॉलर व बॅटींग साठी पिंच हिटर. तो डाव्या हाताने अशी काही बॉलींग टाकायचा की ज्याच नाव ते. तेव्हा देखील तो इन स्विंग मस्त करु शकायचा. त्याचा रनअप बघूनच कदाचित पुढे 'रावळपिंडी ऐक्सप्रेस' ला प्रेरणा मिळाली असावी. तो लांबून पळत यायचा पण जवळ आला की स्लो व्हायचा. हे अजब रसायन मला तेव्हां कळले न्हवते. पण बॉलींग लय सॉलीड.


मी तेंव्हा (आणी अजुनही) बॉलींग, बॅंटीग दोन्ही करायचो। ओपनर म्हणून जाने मला आवडायचे. तर बॉलींग साठी सेमी फास्ट बॉलर होतो तेव्हां. पण जसे जसे वय वाढायला लागले, तसा तसा माझ्या बॉलींग मध्ये जोर जास्त आला. आता इथे अमेरिकेत प्रो लिग्स कडूनही फास्ट बॉलर म्हणून खेळतो. बँटीग मध्ये स्वतः काय स्वतःची स्तूती करायची. शाळेत एकदा सेन्चूंरी लावलीये साहेबा. नंतर देखील लै रन काढून झालेत. ह्या मॅचेस बद्दल पुढे सविस्तर येईलच.



If you enjoyed this post Subscribe to our feed

No Comment

Post a Comment