रॅन्डम मेमरीज -४

1

Written on 1:42 PM by केदार जोशी

आठवीला एक बाई आम्हाला मराठी व्याकरण शिकवीत. त्या बाईंचा माझ्यावर लोभ होता. एके दिवशी एक शब्द चालव असे त्यांनी सांगीतले। आणी मी त्यांना प्रतिप्रश्न केला की, ' बाई शब्दांना चालविन्यापेक्षा मी चालून दाखवू का?' मी असे म्हणाल्याबरोबर त्या म्हणाल्या, ' हो बाळा, निट वर्गाबाहेर पर्यंत चालून दाखव बरं?' अन माझी पहिल्यांदाच वर्गातून हकालपट्टी झाली.


वर्गातून काढल्याबरोबर मी पाणी पिन्याचा हौदाकडे जायला लागलो। तिथे विनोद अन आणखी कुणीतरी दिसले. त्यांचा हातात बहुदा थम्प्स अप च्या बाटल्या होत्या. त्यांनी मला बोलाविले अन त्यांचातील दोन घोट दिले. शाळेत थम्स अप पिऊन मी काही तरी बाजी मारली असे मला वाटले होते तेव्हां. तसाही त्या पोरांशी माझा संपर्क कधीच जास्त न्हवता. आमच्या वर्गाची संख्या ४५ ते ५५ असावी बहूदा. माझा नंबर काय ते ही मला आता आठवत नाही, पण कूठल्या तरी वर्षी तो १४ होता. आमच्या वर्गात १६ ते २० मूली असतील. त्यातल्या फक्त ४ ते ५ च बघनेबल होत्या. बाकी नुस्ता आनंदच. त्यातही काही मूलींचे नाव तर सत्यनारायण पुजेतील होते. कलावती म्हणून एक मुलगी होती. दरवेळी सत्यनारायणाच्या पोथीतील हे नाव ऐकून मला असे वाटायला लागले की पुढच्या वेळी सत्यनारायन तिला आमच्या घरी धाडतो की काय? ती दिसायला फार भयान होती बहुदा, कारण आम्ही तिच्याकडे कधीच बघायचो नाही. मात्र एके दिवशी मी आणि मिल्या शाळेत पायी पायी जात होतो, चालत जाता चाळा म्हणून मिल्या पायाने दगड उडवित होता, नेमका एक दगड ह्या साळकायांना लागला व त्या आमच्याकडे वळून बघू लागल्या. मिल्याने पटकन चेहरा मागे केला पण मि समोरच पाहत होतो. त्या तिथेच थांबल्या, आम्ही येईपर्यंत. मला वाटले की ती कलावती आता तक्रार करनार पण तीला बहुतेक ते आवडले असावे, कारण नंतर ति चार पाच दिवस मिल्याकडे बरेचदा बघत होती.


अशातच एकत्र अभ्यास ही टूम निघाली आणि अन्याने जाहिर केले की सर्व जण त्याचा कडे जाऊन अभ्यासाला लागतील। रव्या सामिल होणार न्हवता कारण तो लांब राहायचा. मिल्या पण नाही कारण त्याला अभ्यास नकोसा वाटायचा. उरलो मी आणि शिन्या. आम्ही हो म्हणालो. अन्याच्या घरा शेजारीच आनंद, अभय व इतर लोक राहायचे. अशातच कमल्याची पण घसीट झाली होती. हे सर्व लोक 'अ' वाले होते. त्यांची अभ्यासाची पध्दत आमच्या पेक्षा थोडी वेगळी होती. ते जोर जोरात वाचन करुन अभ्यास करत, तर मला अन शिन्याला मनातंच वाचायची सवय होती. मग अभ्यास काही होईनासा झाला. घरुन निघायचो अभ्यासाला पण अभ्यास न करताच नुस्ता धिंगाना घालून वापस यायचो.


इग्रंजीची ट्यूशन एका मास्तर कडे लावली. त्यात मी, केश्या, कमल्या, अभय वैगरे मंडळी आमच्या शाळेची होती. त्या सरांची मुलगी पण आमच्याच वर्गात असल्यामूळे ट्यूशनला बसायची. ती खुप सुंदर होती. अगदी रेखीव. तिच्याकडे एक दोघ बघत बसायचे. बघन्यामूळे इंग्रजीची फक्त फिसच दिल्या गेली आणी इंग्रजीत बोंब झाली त्यांची.
त्याकाळी आमच्या वर्गातल्या दोन मूलींनी माझ्या वह्या मागायचे सत्रच लावले होते. एकतर मी जास्त काही अभ्यास करायचो अशातला भाग न्हवता, तसेच अन्या वा रव्या सारखा हूशार होतो असाही भाग न्हवता. पण शाळेतल्या सर्व कार्यक्रमांमध्ये मी भाग घ्यायचो, त्यामूळे नंबर निघायचा व बक्षिस मिळायचे. पण तेवढ्यावरून कोणी सतत वह्या घेतील असे वाटत न्हवते. अन्या ने नंतर सांगीतले की एक मूलगी तूझ्यावर लाइन मारते. त्या 'शाळा' लेखात तिचा उल्लेख आला आहेच. ते गुलाबी पाण तिथेच सोडून पुढे जाऊयात.
माझे परिक्षेबाबत मत ठरलेले होते। की तिथे जायचे, पास होण्यापुरते मार्क मिळवायचे व पेपर देउन उठायचे. आमच्या मातोश्रींचा ह्याला विरोध होता. मी आठवी नंतर ६० मार्कांच्या वर पेपर लिहायचो नाही व त्यातले ५२ ते ५६ मार्क मला मिळायचे. मी आईला म्हणायचो की मला ९० टक्के मार्क मिळाले. आई म्हणायची तूला ५२-५५ टक्के मार्क मिळाले. त्यावर मी तिला म्हणायचो की टक्के हे टक्यांमध्ये बघ. मी फक्त ६० मार्कांचाच पेपर सोडवतो कारण मला तिथून उठून येऊन क्रिकेट खेळायचे असते आणि त्यातले मला ५२-५५ मिळतात. ह्यावर समाधान होत माझ. ही टक्केवारी इतरांपेक्षा स्वतःला कळायला पाहीजे. हवे असल्यास ते पेपर तू आणून पाहा. तिला ते पटायचे नाही. पण मी कधीही परिक्षा देताना पास होईल हे कळल्यवर पेपर देऊन ऊठत असे. त्यात आजही खंड नाही. मला स्वतःला कळले तर बास हेच माझे धोरण. इतरांना का मी पटवायला जाऊ, मी किती हूशार आहे ते? ज्यांना फक्त हूशार लोकांशीच संपर्क साधायचा असतो, त्यांना साधूदेत. आपण परिक्षार्थी नाही. पटत नसल्यास भारतीय इतिहास मला विचारून पाहा आणि ज्याला १० वीत १०० पैकी ९० मार्क मिळाले त्याला विचारून पाहा. माझ्या ह्या धोरणामूळे (इतरांकडे पाहन्यापेक्षा स्वतःकडे पाहा) माझा फायदाच झाला व अनेक गोष्टींचा अभ्यास खोलात करायची सवय लागली.


क्रमशः

If you enjoyed this post Subscribe to our feed

1 Comment

  1. Bhagyashree |

    kay fundu method ahe paper lihnyachi!!
    mala adhich kalayla hava hota!! :(

     

Post a Comment