रॅन्डम मेमरीज - ७

3

Written on 9:46 AM by केदार जोशी

'अ' मधल्या मूलींनी आपल्याला बोलावे, त्यांचा सहवास घडावा असे आमच्या वर्गातील सर्वांना वाटायचे. एकतर आमच्या वर्गातील मूली म्हणजे, 'सावळा गोंधळच' होता. 'अ' वर्गात खरच 'माल' मूली होत्या हे मात्र मान्य करावेच लागेल. त्यांची इथे नावे सांगत नाही. पण बहूतेक तेंव्हा सर्व शाळेवाल्या लोकांनी असा रुल काढला असेल, की ज्या मूली दिसायला सुंदर त्या 'अ' मध्ये, जे मूल वागायला बावळट ते 'अ' मध्ये व उरलेली कचरा पट्टी उतरत्या क्रमाने 'ब', 'क' आणी 'ड' मध्ये. खर काय ते माहीत नाही पण असे काही तरी असेल असे मला तेंव्हा वाटायचे.

एक सांगायचे राहिलेच. माझी मावस बहिन देखील माझ्याच शाळेत, माझ्याच वर्गात पण 'अ' तूकडीत होती. तिच्या मैत्रीनी देखील माझ्याही मैत्रीनी होत्या. त्यामूळे आपली वट पोरांत वाढली होती. बहिन देखील बर्‍यापैकी हूशार होती, त्यामूळे तिच्यात व माझ्यात लहानपणापासूनच एक अघोषीत स्पर्धा होती बहूतेक. ती खास करुन तिच्या वडिलांनी लावलेली होती. आमचे पिताश्री म्हणत," पोटा पुरता अभ्यास कर, खेळायचे वय आहे खेळून घे,' तर तिचे वडिल म्हणत,' केदार दिवंसेदिवस हाताबाहेर चाल्लाय. लक्ष ठेवा.' त्या हाताबाहेर जाण्याला मी वेगळाच अर्थ लावला. मला वाटले की आता त्यांचा हातात मावत नाही कारण माझी उंची खूप आहे. तर त्या अघोषीत कॉम्पीटिशनमूळे मला दर परिक्षे नंतर खूप माणसिक त्रास व्हायचा. एक तर माझी बहिन शाळेत हूशार, गाण्यांत हूशार, क्लासीकल शिकनारी असे काही, काही होती आणी आम्हास बॅटी शिवाय दुसरी भाषा कळायची नाही. बॅट बॉल मध्ये मी इतका रममान होतो की, जेंव्हा आम्ही पायी कुठे जायचो तेंव्हा मी आणि माझा भाऊ चालताना अचानक वेग घेऊन पळत जाऊन बॉलींगची ऍक्शन करत असू आणी लगेच तो काल्पनीक बॉल, काल्पनिक बॅटीने मारून सिक्स मारन्याचा अविर्भाव करत असू. तर असे हे आम्ही अन ह्या विरुध्द माझी मावस बहिन. मग दर परिक्षे नंतर माणसिक छळ. आधी तिच्या वडिलांकडुन, नंतर आमच्या आजोळच्या मंडळी कडुन. एक बरे होते आमची जोशी मंडळी कधी परिक्षेच्या मार्कांवरुन आम्हाला धारेवर घ्यायची नाही. तसा आम्हा जोश्यांत शिक्षनाचा गोंधळ होताच पण आमच्या माय बापांनी कुठल्यातरी जन्मी खूप पूण्य केल्यामूळे आम्ही मुलांनी घराला खूप पूढे नेले असे लोक म्हणतात. आता पूढे म्हणजे कूठे हे आम्हा मुलांनाही माहीत नाही. आम्ही काय पराक्रम केले नाहीत पण ते आत्ता तेव्हां मात्र मग आजोळची मंडळी जोश्यांचा उध्दार करत.

ह्या कम्पीटिशन मूळे मला खूप त्रास भोगावा लागला। तिच्या सारखेच क्लास माझ्या मामा लोकांनी मला लावले, तिच्यासारखेच वेळापत्रक करुन मामा लोक माझ्या पाठीमागे अभ्यासाला लागले. इतकेच काय तर मी १० वीला जास्त मार्क मिळवावेत म्हणून त्यांनी माझी १० वी आजोळी होईल असा रुल केला. माझे आजोळ, माझ्या घरा पासून दो किलोमिटर वर होते त्यामूळे फार काही लांब होत अश्यातला भाग नाही. तर आमच्या ह्या बहिनीमूळे जेवढे फायदे झाले ( ते मुलींशी ओळख असन्याचे) त्यापेक्षा जास्त तोटे झाले व माझे क्रिकेट ह्या लोकांनी निदान १० पुरते बंद पाडायचा घाट घातला. ९ वी च्या सूट्यांमध्ये मी औरंगाबादला आत्याकडे गेलो. त्या दहावि सुरु व्हायच्या सुट्या होत्या. म्हणल आत्ता तरी ही लोक भनभन लावनार नाहीत तर इतक्यात माझ्या बहिणीने १० वी चे व्हेकेशन क्लासेस लावले व मोठ्या मामाने औरंगाबादहून परत आणन्याचा वटहू़कूम काढला. माझे वडिल औरंगाबादला आले व ते मला घेऊन वापस आले.

मग आमची वरात रोज सकाळी ९ ला निघायची व त्या व्हेकेशन क्लासेस पाशी धडकायची. त्यांनी वेगवेगळ्या शांळामधून वेगवेगळे मास्तर निवडले होते व ते हा जोडधंदा सुट्यात पैसे कमवायला करायचे आणि वर आम्हां मूलांच्या सुट्याही खराब करायचे. (त्यातील काही खरच मनापासून शिकवायचे). मग तिथे ९.३० ते ४.०० क्लासेस आणी मधला एक तास सुटी असा दिनक्रम असायचा. मला आधीच अभ्यासाचा कंटाळा. त्यात कोणी असे डांबून ठेवले की मग अजुनच प्रॉब्लेम. माझ्या मोठ्या काकांनी मला एक इलेक्टॉनीक घड्याळ खास दहावी साठी घेउन दिले. त्या क्लासेस चा एक तास ५० मिनीटांचा असायचा. एखाद दिवशी मी गेलो नाही की मग बहिनाबाई तक्रार करायच्या. काय करावे हे सुचत न्हवते आणी एके दिवशी मला उपाय सुचला. मग मी माझ्या घड्याळ्यावर ५० मिनीटाचे टायमर लावायचो व तेवढे सेंकद मोजून काढायचो. मग माझा वेळही जायचा, मी क्लास मध्ये दिसत असल्यामूळे बहिनाबाई तक्रार करायच्या नाहीत आणी मी तिथे रोज असतो म्हणजे माझा १० वी चा अभ्यास व्यवस्तिथ चालत आहे हे सर्वांना वाटायचे. माझ्या बाजूला संदिप देशपांडे नावाचा पोरगा बसायचा. तो देखील बोअर व्हायचा बहूतेक. मग तो आणी मी हा खेळ खेळत दिवसभर बसायचो. त्याचाशी मैत्री वाढली. तो आमच्या शाळेत न्हवता पण पुढे चांगला मित्र झाला. त्याची बहिन देखील आमच्याच वर्गात होती. भावना देशपांडे पण मी, भावडी, संद्या अशी जोडी झाली व आम्ही हळूहळू आमच्या बहिनाबाईला टाळू लागलो. ती बिचारी खरच अभ्यास करायची. तिच्या वडिलांनी तिला एक वेळापत्रक बनवून दिले होते. ते वाचून आमच्या मातोश्रींनी तसेच काही तरी करा असा अनावश्यक सल्लाही दिला होता. पण तो मी शिताफीने टाळला. तिच्या वेळापत्रकात विषयानूसार वेळ वैगरे अलोकेट केला होता, फारच सखोल विचार करुन ते वेळापत्रक तयार केले असनार हे नक्की. तसा अभ्यास तिने केला का हे माहीत नाही पण तिच्या वेळापत्रकामूळे माझ्या मामाने मी देखील अभ्यास करावा हे टुमने लावले व मला तो काही महिन्यांकरता त्याचा कडे घेउन आला.
तो बँकेतून आला की दोन तास माझा अभ्यास घेत असे. हे दोन तास मात्र अभ्यास करने भागच होते, कारण पळवाट न्हवती म्हणून मग मी काही दिवस तसा अभ्यास केला. नंतर माझ्या लक्षात आले की मामा दरवेळी वरचे घड्याळ पाहून ठरवतो व साधारन ८.४५ झाले की तो अभ्यास थांबवतो. मग मी एक शक्कल लढवली. तो थोड्यावेळाकरता खोलीतून बाहेर गेला की मी उठायचो व ते घड्याळ २० मिनिटे पुढे करायचो. मग तेवढाच २० मिनीटे अभ्यास कमी व्हायचा व जास्त झोपायला मिळायचे. मग सकाळी उठून परत ते घड्याळ मागे करुन वेळ बरोबर करत असे, म्हणजे परत त्या दिवशी संध्याकाळी पुढे करायला मोकळा. हे त्यांना अजुनही कळले नाही. अभ्यासातले माझे हे टॉप सिक्रेट आज मी इतक्या वर्षांनंतर सांगीतले.

क्रमशः

If you enjoyed this post Subscribe to our feed

3 Comments

  1. Kamini Phadnis Kembhavi |

    are wa blog vishwaat swagat re :)
    arthaat tu aalaa kadhih ithe as distya paN malaa aaj disalaas mhanUn mee aaj wellcome karatey.

    likhate raho :)

     
  2. केदार जोशी |

    धन्यवाद. :)

     
  3. यशोधरा |

    >>अभ्यासातले माझे हे टॉप सिक्रेट

    bhannatach aahes! ekadam sahee re!:D

     

Post a Comment